म्हसवड दि. ६
म्हसवड येथे एकाने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणुन येथील एका मुलास मारहाण करुन त्याच्या खिशातुन दीड हजार रुपये घेवुन पोबारा केल्याची घटना घडली असुन याची तक्रार मुलाचे चुलते निलेश जालींदर पिसे यांनी म्हसवड पोलीसांत दिली असुन पोलीसांनी याप्रकरणी मुसा सिकंदर नदाफ याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेत अटक करुन त्याला येथील न्यायलायासमोर हजर केले असता म्हसवड न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती अशी येथील माळी गल्ली याठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौच्छालयाजवळ लघुशंकेसाठी दि.५ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास गेलेल्या देवराज आनंद पिसे याच्याजवळ तेथीलच मुसा सिकंदर नदाफ हा गेला व त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैशाची मागणी करु लागला त्याने नकार देताच त्याला मारहाण करु लागल्याने देवराजने केलेल्या आरडा- ओरड्याने तेथेच बाजुला अलसलेले त्याचे चुलते निलेश जालिंदर पिसे हे धावत आले त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा भाचा अजिंक्य विजय विधाते हा सुध्दा त्याठिकाणी धावत गेला असता, मुसा नदाफ याने देवराज च्या हाताला घट्ट पकडुन ठेवले होते व त्याने त्याच्या खिशातील दीड हजार रुपयाची रोकड घेतली त्याला प्रतिकार करण्यासाठी धावुन येत असलेले निलेश व अजिंक्य ला पाहुन मुसा याने देवराज चा हात सोडुन अंधाराचा फायदा घेत त्याठिकाणाहुन गायब झाला. या प्रकारानंतर भेदरलेल्या देवराजला घेवुन त्याचे वडील व चुलते यांनी म्हसवड पोलीस स्टेशन गाठले याठिकाणी स.पो. नि. अक्षय सोनवणे यांनी देवराजला विश्वासात घेत सखोल चौकशी करीत मुसा सिकंदर नदाफ याच्यावर दमदाटी करुन, पैसे हिसकावुन पळ काढणे ४१५ / २०२५ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुसा नदाफ याचा शोध घेत त्याला रात्री उशीरा ताब्यात घेत त्याच्यावर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करुन येथील न्यायालयासमोर हजर केले असता म्हसवड न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असुन अधिक तपास एन.एन. पळे ह्या करीत आहेत.
