म्हसवड दि. ६
शैक्षणिक क्षेत्रात माणसह सातारा जिल्ह्यात मोठा नावलौकीक असलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या क्रांतीरंग स्नेहसन्मेलनाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास मोठ्या उत्साहात पालकवर्गास विद्यार्थी वर्गाने मोठा प्रतिसाद दिल्याने क्रांतीरंग स्नेहसन्मेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलनामध्ये नेहमीच विद्यार्थ्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, त्याचबरोबर शैक्षणिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांचे व खेळांचेही आयोजन केले जाते, म्हसवडच्या माळरानावर येथील प्रा. विश्वंबर बाबर व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी सुमारे २५ वर्षापुर्वी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सदर संकुलनाने आजवर अनेक आदर्श विद्यार्थी घडवले आहेत तर शैक्षणिक, क्रीडा व स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळवले आहेत, राज्यस्तरीय शैक्षणिक मानांकनाचे स्थान ही सदर संकुलनाने मिळवलेले असुन पालकांच्या विश्वासाचे व विद्यार्थ्यांच्या पहिल्या पसंतीचे सदरचे शैक्षणिक संकुल ठरले आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित सदर स्नहसन्मेलनात इयत्ता पहिली ते १० तील विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपल्यातील कला सादर करुन पालकांसह, शिक्षकांनाही संमोहित केले. यावेळी सदर स्नेहसन्मेलनासाठी हजारो पालकवर्गाने उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


