म्हसवड दि. १३
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते, रक्ताची गरज ही कधी कोणाला भासेल हे सांगता येत नाही ही गरज ओळखुन देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त म्हसवड व वडुज शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात शेकडो रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान करुन आपल्या लाडक्या नेत्यांना वाढदिनाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
शरदचंद्र पवार गटाचे सातारा जिल्हा सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी यासाठी पुढाकार घेत सदर रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी म्हसवड व वडुजनगरीत आयोजित केलेल्या या शिबीरामध्ये शेकडो दात्यांनी सहभागी होत उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. वडुज येथील आयुष ब्लड सेंटरच्या टिमने यामध्ये योगदान दिले. यावेळी अभयसिंह जगताप बोलताना म्हणाले की देशाचे नेते व मराराष्ट्राची शान म्हणुन पवार साहेबांना संपूर्ण देश ओळखतो अशा या महानेत्यांचा वाढदिवस हा १२/१२ ला दरवर्षी येतो. तो सर्वजण मोठ्या प्रमाणावर साजराही करतात मात्र यंदाचा वाढदिवस आपण हटके साजरा करण्याचे ठरवले होते त्यानुसार आपण आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. माझ्या या आवाहनाला म्हसवड व वडुज नगरीतील कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिल्यानेच आपण रक्तदान शिबीर यशस्वीपणे राबवु शकलो.
म्हसवड येथे घेण्यात आलेल्या या शिबीरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी सहभागी होत रक्तदान केले, तर वडुज येथेही मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. म्हसवड शहरात १०७ तर वडुज येथे ४२ रक्तदात्यांनी सहभागी होत हे शिबीर यशस्वी केल्याबद्दल सहभागी सर्व रक्तदात्यांचे जगताप यांनी आभार मानले.
