म्हसवड दि. १७
म्हसवड येथील सुप्रसिद्ध असलेले आर्थोपेडीक तज्ञ डॉ. बाबासो मारुती दोलताडे यांनी आपल्याच रुग्णालयात काम करणार्या एका महिलेवर ९ महिने सतत विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार केला असल्याची तक्रार संबधित महिलेने म्हसवड पोलीस स्टेशन ला दिली आहे.
याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन कडुन समजलेली अधिक माहिती अशी की म्हसवड येथील दोलताडे हॉस्पिटल चे मालक शहरातील सुप्रसिद्ध आर्थोपेडीक तज्ञ डॉ. बाबासो मारुती दोलताडे यांनी यांचे आपल्याच रुग्णालयात कामाला असलेल्या एका महिलेला दि.१४ / २/ २०२५ ते ५/ ११/ २०२५ या नऊ महिन्याच्या दरम्यान संबंधित महिलेला जिवे मारण्याची धमकी देवुन रुग्णालयातील ऑपरेशन थियटर येथे व येथील गलंडे हॉस्पिटल च्या पाठीमागे असलेल्या फ्ल्याट मध्ये जबरदस्ती ने नेवुन आपल्या इच्छेविरुध्द वारंवार जिले मारण्याची धमकी देवुन शारीरिक अत्याचार केला असल्याची फिर्याद दिली असुन सदर फिर्यादीवरुन म्हसवड पोलीसांनी डॉ. दोलताडे यांच्यावर ४२९/२०२५, बी एन एस ६४,६४ ( १ई ) म( ६८ ड )३५१ (२ )(३ ) याप्रमाणे गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास स.पो. नि. अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
दरम्यान म्हसवड येथील डॉ. दोलताडे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची खबर शहरात पसरताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन या घटनेची शहरात खमंग चर्चा सुरु आहे.
दरम्यान याच घटनेच्या पार्श्वभुमीवरुन गत काही दिवसांपुर्वी याच डॉ. दोलताडे यांनी शहरातील ५ जणांविरोधात ५० लाखाची खंडणी मागितली असल्याचा म्हसवड पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे, याचा तपास सातारा गुन्हे विभाग पोलीसांकडुन सुरु आहे.०००
