म्हसवड दि. १७
म्हसवड येथील सुप्रसिद्ध असलेले डॉ. बाबासो दोलताडे हे खरे तर सर्व रुग्णांसाठी देवदुत ठरलेले आहेत, त्यांनी यापुर्वी अनेकांना मदतच केली आहे, आमच्या याच रुग्णालयात कामाला असलेल्या एका दांपत्यांनी रुग्णालयात केलेला आर्थिक भ्रष्टाचार लपवण्यासाठी संबंधित दांपत्यांनी शहरातील गावगुंडाना हाताशी धरुन डॉ. दोलताडे यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, मात्र आमचा न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास असुन यातुन डॉक्टर निर्दोष सुटतील याची मला खात्री असल्याचा विश्वास येथील डॉ. रेखा दोलताडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
म्हसवड येथील डॉ. बाबासो दोलताडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा म्हसवड पोलीसांत दाखल केला असुन हा गुन्हा खोटा असल्याचा आरोप संबंधित डॉक्टरांच्या पत्नी डॉ. रेखा दोलताडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे, त्या पुढे म्हणाल्या की म्हसवड शहरात आमचे दोलताडे मल्टी स्पेशलीस्ट नावाचे हॉस्पिटल असुन ते रुग्णालय म्हसवड पंचक्रोशीतील रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. याच आमच्या रुग्णालयात राखुंडे पती पत्नी कामाला होते त्यांच्याकडेच रुग्णालयाचा सर्व आर्थिक हिशोब होता त्यांच्यावर सरांचा पुर्ण विश्वास होता, मात्र या दांपत्याने डॉक्टरांचा विश्वासघात करीत रुग्णालयातील पैशाचा अपहार केला. हे जेव्हा आमच्या निदर्शनास आले तेव्हा आम्ही सदर दांपत्याच्या विरोधात म्हसवड पोलीस स्टेशन ला दि. ९ / ११/ २०२५ रोजी रितसर तक्रार दिली आहे. मात्र त्या तक्रारीची पोलीसांनी दखल न घेतल्यानेच संबंधित दांपत्यांनी गावातील गावगुंडाना हाताशी धरुन आम्हालाच धमकी देत होते, आम्ही सदर दांपत्याच्या विरोधात दिलेली तक्रार मागे घ्यावी याकरीता ते दांपत्यांनी गावगुंडाना हाताशी धरुन डॉक्टराना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होते मात्र आम्ही त्यांच्या धमक्यांना भिक न घातल्याने शेवटी या सर्वांनी मिळुन कटकारस्थान रचित दांपत्याच्या पत्नीच्या नावे डॉक्टरांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र आमचा न्याय देवतेवर पुर्ण विश्वास असुन न्याय देवता डॉक्टरांना नक्कीच न्याय देईल अशी आम्हाला खात्री असल्याचे शेवटी डॉ. रेखा दोलताडे यांनी सांगत यातील दुध का दुध, पाणी का पाणी हे लवकरच समोर येईल असे स्पष्ट केले.०००
