म्हसवड दि. २७
म्हसवड पालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असुन प्रभाग क्र. ४ मध्ये सिध्दनाथ नागरिक आघाडीचे उमेदवार निश्चित निवडुन येतील असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडुन पालिका निवडणुकीसाठी सिध्दनाथ नागरिक आघाडीकडुन निवडणुक लढवत असलेले प्रभाग क्र. ४ मधील उमेदवार अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या संवाद रँलीत ते मतदरांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की मतदारांचा या प्रभागात अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतदार आम्हाला साकडे घालत आहे. सामान्य जनतेला आता शहरातील नगराध्यक्ष हवा आहे, येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, या प्रश्नाची सोडवणुक करुनच आम्ही मत मागायला तुमच्या दारात येवु असे मंत्री महोदयांनी म्हसवडच्या जाहीर सभेत म्हसवडकरांना दिला होता, मात्र मी या निवडणुकीच्या निमीत्ताने एक प्रश्न विचारतो की खरोखर म्हसवडकरांना २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे का ? असा प्रश्न उपस्थित करुन देशमुख म्हणाले की जर म्हसवडकरांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होत नसेल तर पालिकेची सत्ता हाती देवुन आपला भ्रमनिरास करण्यात काय अर्थ. येथील सामान्य जनता भयभित आहे, त्यांच्यावर दडपण आणले जात आहे मात्र पालिका निवडणुकीत सामान्य जनता हे दडपण झुगारुन सिध्दनाथ विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
यावेळी अभयसिंह जगताप बोलताना म्हणाले की सिध्दनाथ नागरिक आघाडीकडुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले सर्व उमेदवार हे सर्वसामान्य घरातील असुन सामान्य जनतेनेच त्यांना आपले प्रतिनिधी म्हणुन स्विकारलेले आहे, सामान्य जनतेचे प्रश्न हे सामान्य कुटुंबातील व्यक्तींनाच माहित असणार आहेत त्यामुळे सामान्य जनता सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी आहे.
यावेळी अँड. निसार काझी बोलताना म्हणाले की मुस्लिम समाजाचाही प्रभाग ४ मधील उमेदवारांना पाठींबा असुन सर्वसामान्य मुस्लिम समाजाचे प्रश्न फक्त सिध्दनाथ नागरिक आघाडीकडुन सुटले जातील असा विश्वास येथील सर्व समाजाला वाटत असल्यानेच हा समाजाने आपला पाठींबा अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या दर्शिवला आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने यांनीही या संवाद यात्रेत सहभागी होत स्वत: सोबत कांबळे व सरतापे या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करीत सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या हाती पालिकेची सत्ता देण्याचे आवाहन केले.
चौकट –
प्रभाग क्र. ४ मध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद –
अर्जुन कांबळे व सुनीता सरतापे यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्र. ४ मध्ये काढलेल्या संवाद यात्रेत मोठ्या प्रमाणावर महिलावर्ग सहभागी झाल्याचे दिसुन आले, तर अर्जुन कांबळे यांच्या उमेदवारीचे स्वागत करताना या प्रभागातील भोई समाजाने एकत्र येत एक मुखी पाठींबा त्यांना दर्शवत त्यांच्यासाठी प्रचार सुरु केला आहे.०००

