म्हसवड दि. २१
– सिध्दनाथाच्या नावानं चांगभल च्या
जयघोषात मानकऱ्यांच्या व भाविकांच्या
उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिध्दनाथ
व माता जोगेश्वरीचा रथ जाड दोरखंडाच्या
साह्याने रथगृहातून बाहेर काढून तो
मिरवणुकीसाठी सज्ज करण्यात आला.
दीपावली पाडव्यास पारंपारिक
पध्दतीने श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरीचा
शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभ
झाला. श्रींच्या उत्सव मुर्तीींना हळदी
लावणे, त्यानंतर तुलशी विवाहच्या
मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहा
नंतर होणा-या देवदिवाळीस वधु-वराची
वरात म्हणेजच रथ मिरवणुकीने या
शाही विवाह सोहळ्याची सांगता होणार
आहे. या रथोत्ससवासाठी गेली वर्षषभर
रथगृहात बंद असलेला श्रींचा रथ हा आज
कार्तिक एकादशी दिवशी रथगृहातून बाहेर काढण्यात आला
रिंगावण पेठ मैदानातून विराजमान
झालेला श्रींचा रथाची संपुर्ण नगरप्रदक्षिणा
केली जाते. हा रथ भाविक जाड
दोरखंडाच्या साह्याने श्रींचा रथ हाताने
ओढीत मार्गस्थ करतात. यावेळी भाविक
गुलाल-खोबऱ्याची उधळण करत
असतात. या रथोत्सवाच्या आदल्या
दिवशी आमावस्येला रथाचे कळस व
मानाची वस्त्रे रथावर चढवली जातात व
रथोत्सवाच्या दिवशी सकाळी श्रींचा नैवद्य
व सिंहासन हे राजेमाने मानकऱ्यांच्या
राजवाड्यातून मंदिरात जाते व तेथूनच
ते सिंहासन व नैवद्य यात्रा पटांगणावरील
रथामध्ये नेला जातो व मानकऱ्यांच्या
उपस्थितीत मंदिरातून श्रींच्या उत्सवमूर्ती
पालखीतून रथापर्यंत नेल्या जातात.
पालखी रथाजवळ आल्यानंतर
मानकरी राजेमाने यांच्या उपस्थितीतच
श्रींच्या उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान
केल्या जातात व परंपरेनुसार या रथामधिल
श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या
मुर्तीचे पुजन करून रथाचे पुजन करून रथ
मार्गस्त करून रथोत्सवास प्रारंभ होतो.
यावेळी सालकरी रामचंद्र व्हंकारे ( गुरव) मठाधिपती रविनाथ महाराज, रथाचे मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत गणपतराव राजेमाने, श्रीमंत
प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज
राजेमाने, श्रीमंत तेजसिंह राजेमाने, श्रीमंत
दिपसिंह राजेमाने, श्रीमंत विश्वजित
राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने आदी
मानकरी माळी, लोहार, सुतार, व बारा
बलुतेदार मानकरी उपस्थित होते.०००
