म्हसवड दि. १७
म्हसवड नगरपरिषदेमध्ये सध्या पंचवार्षीक निवडणुकीची धामधुम सुरु आहे, अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुदतीनंतरही येथील निवडणुक निर्णय अधिकार्यांनी जोडपत्रे स्विकारुन आयोगाने घालुन दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप येथील युवा नेते श्रीमंत तेजसिंह राजेमाने यांनी पत्रकारांशी सवांद साधताना केला असुन या अधिकार्याविरोधात आपण उच्च निवडणुक आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले.
येथील श्रीमंत तेजसिंह राजेमाने यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी आपली पत्नी भुवनेश्वरीदेवी राजेमाने यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातुन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे, पालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी या गटाने आपले सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्यासाठी सकाळी ११ ते ३ अशी वेळ आयोगाने ठरवुन दिलेली आहे. आयोगाने ठरवुन दिलेल्या वेळेपुर्वीच आम्ही आमच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत, मात्र विरोधी असलेल्या भाजपच्या ३ उमेदवारांचे जोडपत्रे ही ३ वा. नंतर कार्यालयाचा बंद केलेला मुख्य दरवाजा उघडुन देण्यात आलेली आहेत. यावर आम्ही आक्षेप घेतला असता निवडणुक निर्णय अधिकार्यांनी आमचे काही ऐक म्हणणे ऐकुन घेतले नाही हा अधिकारार्यांचा दुटप्पीपणा असुन आयोगाच्याच नियमांची येथे अधिकारी पायमल्ली करीत आहेत, आम्ही सदर अधिकार्याच्या विरोधात उच्च आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रारी केली असुन अधिकारी जर दुजाभाव करीत असतील तर लोकशाही जिवंत राहिल कशी असा प्रश्नही यावेळी राजेमाने यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी ही निवडणुक निर्णय अधिकार्यांवर हल्लाबोल करीत त्यांच्या विरोधात आपण जिल्हाधिकार्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. तर अधिकार्यांच्या या दुटप्पी भुमिकेचा आम्ही निषेध करीत असुन भाजपकडुन ३ नंतर आलेल्या जोडपत्राचे कार्यालयातील सिसिटीव्ही फुटेजची आम्ही मागणी केली असल्याचे सांगितले.
दरम्यान पालिका निवडणुक अधिकारी मीना बाबर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की निवडणुक प्रक्रिया ही पुर्णपणे पारदर्शी सुरु असुन ३ नंतर आम्ही कोणाचेच जोडपत्र स्विकारलेले नाही, जे लोकं मुख्य दरवाजाच्या आतंमध्ये होते त्यांचेच जोडपत्र आम्ही स्विकारलेले असुन संबधितांनी अकारण गोंधळ उडवला आहे. त्यांना हवे ते फुटेज मागणी केल्यास देवु शकतो असे सांगितले.
