शक्तीप्रदर्शन करीत पा लिका निवडणुकीसाठी केले अर्ज दाखल
म्हसवड दि. १४
म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीची शहरात सध्या चांगलीच धामधुम सुरु असुन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी माणचे युवा नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी म्हसवड शहरात मोठे शक्ती प्रदर्शन करीत दमदार रॉयल एन्ट्री करीत आपल्या गटाचे उमेदवारी अर्ज दाखल केले.
म्हसवड पालिका निवडणुकीत आजपासुन खर्या अर्थाने रंग भरण्यास सुरुवात झाली असुन शेखर गोरे यांनी ही निवडणुक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्धार करीत निवडणुकीच्या या आघाड्यात रॉयल एन्ट्री करीत थेट नगराध्यक्ष पदासह अन्य तीन प्रभागात ६ उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
शेखर गोरे माणच्या राजकारणातील एक वादळ म्हणुन संबोधले जाते, पालिका निवडणुक जाहीर झाल्यापासुन सर्वांचेच लक्ष हे शेखर गोरे यांच्या भुमिकेकडे लागलेले होते ते कोणती भुमिका घेतील यावर येथील राजकिय समिकरणे ठरत असल्यानेच प्रत्येकाचे लक्ष शेखर गोरे यांच्याकडे लागले होते. एकीकडे भाजप व विरोधी गटाचे उमेदवारांचे समीकरण जुळेना असे चित्र असताना शेखर गोरे यांनी अचानक म्हसवडच्या राजकारणात धडाकेबाज एन्ट्री करीत पहिल्या टप्प्यात ७ उमेदवारांचे अर्ज दाखल केले.
यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी येथील माजी नगराध्यक्ष विलासराव माने यांच्या सुनबाई सौ. गौरी विशाल माने यांचा अर्ज दाखल केला आहे, तर इतर प्रभागातुनही आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत, यामध्ये प्रभाग क्र. १ मधुन सोमनाथ अजिनाथ कवी, प्रभाग क्र. २ ट मधुन किर्ती आनंदा मासाळ व त्याच प्रभागातुन त्यांचे पती आनंदा महादेव मासाळ, प्रभाग क्र. ३ विक्रम लोखंडे, प्रभाग क्र. ५ मधुन मोनिका महेश लिंगे, प्रभाग क्र. ७ मधुन प्रतिक्षा सोमनाथ कवी, प्रभाग क्र. ८ मधुन धनाजी रामचंद्र माने अशा ७ सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम सुरु होवुन चार दिवस लोटले असुन मागील ४ दिवसांत कोणत्याच राजकिय पक्ष व आघाडीकडुन उमेदवारी अर्ज दाखल झालेले नव्हते मात्र आजपासुन निवडणुकीला रंग भरायला सुरुवात झाली आहे.
फोटो –

