Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

आरोग्य मित्राच्या संकल्पनेतुन साकारतंय खटाव तालुक्यात कँन्सर हॉस्पिटल

By adminmandand
April 4, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि.४ ( महेश कांबळे )
आजच्या फास्टफुटच्या जमान्यात माणसांचे आरोग्य हे धोक्यात आले असल्याने विविध आजाराने डोकं वर काढले आहे, यामध्ये कर्करोगाची मोठी भर पडली आहे. मात्र कर्करोगाला कोणीही घाबरुन न जाता त्याच्याशी लढा असे आवाहन म्हसवड येथील आरोग्य मित्र इंजीनियर नितीन तिवाटणे यांनी केले आहे.
आपल्या आईचा कर्करोगाने बळी घेतल्याने हताश झालेल्या या आरोग्य मित्राने भविष्यात कर्करोगाने कोणाचा बळी जावु नये यासाठी जिद्दीने उभा रहात कर्करुग्णांसाठी देवदुत बनण्याचे ठरवत या बहाद्दराने खटाव तालुक्यातील सातेवाडी गावच्या हद्दीत साडे १२ हजार स्केअर फुुटाचे कँन्सर रुग्णालय उभारण्याचे काम हाती घेतले असुन या कामाचा शुभारंभ ही आता लवकरच होत आहे, यानिमीत्ताने तिवाटणे यांच्या संकलपनेतुन साकारण्यात ये असलेल्या सर्वज्ञ सामाजिक संस्थेच्या कार्याचा आढावा पुढील प्रमाणे
रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन अखंडीतपणे रुग्णसेवेत कार्यरत राहणारे म्हसवड येथील नितीन गजानन तिवाटणे हे स्वत: उच्च शिक्षित असुन ते इंजिनियर आहेत, अनेक वर्ष विविध नगरपरिषदांमध्ये त्यांनी अभियंता म्हणुन सेवा बजावली असली तरी म्हसवड सारख्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या म्हसवड पालिकेच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी त्यांनी सन १९९९ साली अहोरात्र मेहनत घेवुन जिवन प्राधिकरणाच्या योजनेसाठी त्यांनी त्या विभागाच्या सोबत काम करुन शहराची पाणी टंचाई दुर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. म्हसवड शहर हे ग्रामीण विभागात येते त्यामुळे हे शहर आजवर नेहमीच दुर्लक्षीत राहिले आहे. म्हसवड पालिकेत काम करीत असतानाच त्यांना त्यांच्या आई ला कर्क रोग झाल्याचे निदान झाले. तेव्हा मात्र या इंजिनीयरचे हातपायच गळाटले, मात्र मातृ सेवा हीच ईश्वर सेवा मानत या बहाद्दराने आपली नोकरी संभाळीत आईची सेवा करण्यास सुरुवात केली. ही सेवा करतानाच कर्क रोग झालेल्या व्यक्तीला काय त्रास होतो याचा त्यांना चांगलाच अनुभव आल्याने त्यांनी मनोमन कर्करुग्णांबद्दल जादा प्रेम वाढु लागले. आपल्या आईची सेवा करताना त्यांच्या असे लक्षात आले की आपल्या आजूबाजुलाही असे कर्करोगाचे अनेक रुग्ण आहेत, मात्र त्यांना पुरेसा उपचार मिळत नाही, त्यांना नेमकी हीच बाब खटकली आणी त्यांनी परिसरातील अशा रुग्णांचा शोध घेतला, त्या रुग्णांशी ते थेट संवाद साधु लागले त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचाराची ते माहिती घेवुन त्यांना आणखी कोणत्या उपचााराची आवश्यकता आहे याची पुरेपुर माहिती ते त्यांच्या कुटुंबियांना देवुन त्या रुग्णांशी आपुलकीने वागण्याचा सल्ला ते देवु लागले, त्यांच्या या स्वभावामुळे त्यांची हळुहळु आरोग्य मित्र अशी नवी ओळख निर्माण झाली, यामुळे ते परिसरातील अशा रुग्णांच्या घरी जावुन त्यांना समुपदेश करु लागले, आपल्या आईला ते गुजरात येथुन औषध आणत होते, तेच औषध ते इतरांनाही देवु लागले, याचा चांगला परिणाम अनेक रुग्णांवर झाल्याने अनेकांना यामुळे नवसंजिवनी मिळाली त्यामुळे जिवदान मिळालेले अनेक रुग्ण तिवाटणे यांना अक्षरशा देवदुत मानु लागले. अनेकांना जीवदान देणार्या या आरोग्य मित्राला एक दिवस त्यांच्या मातोश्रीच सोडुन गेल्या, एवढी त्यांची सुशुश्रा करुनही आपल्या आईला त्यांना जिवदान जरी देता नाही आले तरी मात्र त्यांनी आपल्या आईच्या आयुष्याची दोरी मात्र खुप बळकट केली होती. आजाराचे निदान होवुनही त्यांच्या मातोश्री अनेक वर्ष जगल्या त्या केवळ तिवाटणे यांच्या रुग्णसेवेवरच. त्यानंतर मोठ्या धिराने उभे रहात या आरोग्य मित्रा ने आपले उर्वरीत आयुष्य हे रुग्णसेवेलाच वाहयचे असे ठरवले, त्यामध्ये त्यांना त्यांच्या पत्नी सविता नितीन तिवाटणे यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले, त्यांच्याच सुचनेनुसार व रुग्णसेवेच्या प्रेरणेमुळे नितीन तिवाटणे यांनी यापुढे कर्करोगाने कोणाचा बळी जाता कामा नये असा संकल्प सोडत त्यासाठी याच माण- खटावच्या भुमीत सुसज्ज असे कँन्सर हॉस्पिटल उभारण्याचा घाट घातला त्यांना सुरुवातीला अनेकांनी वेड्यात काढले पण म्हणतात ना जिद्दीसमोर परमेश्वरालाही माघार घ्यावी लगाते. तिवाटणे यांची हीच जिद्द कामी आली आणि त्यांच्या या संकल्पपुर्तीसाठी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील शेडे- पाटील या त्यांच्या मित्राने स्वत:ची १ एकर जागा मोफत दिली, मग काय तिवाटणे यांनी एक एक करीत साखळी तयार केली त्यांच्या या संकल्पनेला अनेक दानवीरांनी मग मदत देवु केली त्यातच एक महत्वाचे नाव म्हणजे उद्योजक अरुण देसाई यांनी यासाठी लागणारे सीमेंट, खडी, दगड, विट माती देण्याचे कबुल करीत प्रत्यक्षात ती देण्यासही सुरुवात केली. चांगल्या कामाला फक्त सुरुवात करणे गरजेचे आहे, मदत आपोआप येते, फक्त तुमचा हेतु साफ पाहिजे, आज खटाव तालुक्यातील सातेवाडी परिसरातील माळरानावर सुमारे साडे १२ हजार स्वेअर फुटाचे बांधकाम सुरु होत असुन याठिकाणी सुसज्ज असे कँन्सर हॉस्पिटल उभा राहतयं त्यासाठी तज्ञ अशी डॉक्टरांची टिम ही याठिकाणी रुग्णसेवेसाठी उपस्थित राहणार असल्याने हे रुग्णालय खरोखरच कर्करुग्णांसाठी एक नवसंजिवनी ठरणार असुन त्याठिकाणी मोफत उपचार होणार असल्याने हे रुग्णालय एक वरदान ठरणार आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाचा तर शुभारंभ होत हेच, आता प्रतिक्षा आहे ते सदरचे रुग्णालय लवकरात लवकर उभे राहण्याचे त्यासाठी नितीन तिवाटणे यांची सर्वज्ञ सामाजिक संस्था विशेष लक्ष देत असुन त्यांच्या या सामाजिसंकल्पपुर्तीसाठी त्यांना सर्वज्ञ या सामाजिक संस्थेची उभारणी केली, त्या संस्थेच्या माध्यमातुनच त्यांनी सामाजिक कामे व रुग्ण सेवा अखंडीतपणे सुरु ठेवल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत आजवर त्यांना विविध स्तरावरील शेकडो पुरस्कार देवुन गौरवण्यात आले आहे.०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

कडाडलेल्या विजेने घेतला शेतकर्याचा बळी, माण तालुक्यातील तोंडले गावातील घटना

Next

म्हसवडचा अवलीयाने शोधले पित्तनाशक औषध

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme