Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

म्हसवडचा अवलीयाने शोधले पित्तनाशक औषध

By adminmandand
April 6, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि. ६ ( महेश कांबळे )
माण तालुका म्हटले की प्रत्येकालाच आठवतो तो येथील दुष्काळ, मात्र याच दुष्काळी परिस्थीतीने अनेक नवरत्ने घडवली आहेत, येथील दुष्काळावर मात करीत येथील नररत्नानी माणची दुष्काळी ही ओळख खोडुन काढत माणच्या शिरपेचात मानाचे नव नवीन तुरे रोवण्याचे काम केले आहे.
कला, क्रिडा, स्पर्धा अथवा प्रशासकीय आदी सर्व क्षेत्रात माणचा झेंडा उंचावलेला असतानाच आता म्हसवड च्या सुरज मोडासे या अवलीयाने चक्क पित्तावर मात करणारे आयुर्वेदीक औषध निर्माण केले असुन त्याचा शंभर टक्के रिझर्ट असल्याने दुर, दुर वरुन त्यांच्या या औषधाला मागणी होवु लागली आहे. त्यांच्या या औषध संशोधनामुळे माणच्या शिरपेचात आणखी एक तुरा नक्कीच रोवला गेला आहे, त्यांचा आयुर्वेदीक औषध विक्रेता ते औषध निर्माता हा प्रवास कसा घडला याबाबतची सुरज मोडासे ने अनुभव त्याच्याच बोलीभाषेत आम्ही आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
जिथे पिकते तिथे विकत नाही ही म्हण आपल्याकडे चांगलीच प्रचलित आहे. अगदी याच म्हणीचा प्रत्यय पदोपदी येथील औषध निर्माते सुरज यांना आला आहे, त्यांच्या आईचे आयुर्वेदिक औषध विक्रीचे दुकान म्हसवड शहरात आहे, खरे तर आपल्या धर्मशास्त्रातही आयुर्वेदाचे खुप महत्व असल्याचे सांगितले आहे, त्यामुळेच त्यांच्या आईने १९९१ मध्ये म्हसवड शहरात आयुर्वेदिक औषध विक्रीचे दुकान सुरु केले, त्यावेळी सुरज हा लहान असल्याने तो शालेय शिक्षण घेत होता, त्यानंतर त्याने शालेय शिक्षण पुर्ण करुन आपल्या आईच्या या व्यवसायात लक्ष घातले, २००१ सालापासुन सुरज हा व्यवसाय संभाळत आहे, मात्र जी मार्केट मध्ये औषधे आहेत तीच आणने व त्याची विक्री करणे हेच काम तो करीत होता, त्यामध्ये मार्केटमधील औषधे आणने आणी विक्री करणे हा त्याचा उद्देश नसल्याने त्यात त्याला समाधान वाटत नव्हते. आपल्याला नवीन काहीतरी करावे असे सतत त्याला वाटत असल्याने त्याने या विचारात कित्येक रात्री जागुन काढल्या, अन् एक दिवस आपणच अशा एका औषधाची निर्मीती करावी हा विचार मनी पक्का करुन त्याने त्यासाठी प्रयत्न सुरु केले. घरीच आयुर्वेदिक औषधाचे दुकान असल्याने त्यातील बरेच ज्ञान त्याला प्राप्त झाले होते, त्यावर त्याने मग नवीन औषध निर्मीती सुरु केली. आजकाल प्रत्येकालाच पित्ताच त्रास होत आहे याची सुरजला पुर्ण कल्पना असल्याने त्याने यावर काम करण्यास सुरुवात केली.आयुर्वेदातील अनेक घटक त्याने एकत्र करुन पित्तावर एसीलॉक्ड ही एक पावडर तयार केली. त्यातील घटकांमुळे कसलेही पित्त असो त्यावर १०० टक्के फरक असल्याचा दावा या नव औषध निर्मात्याने केला आहे. त्याने तयार केलेले हे एसीलॉक्ड औषध सुरुवातीला त्याने स्वत:च्या विजय आयुर्वेदिक औषधालय याठिकाणी विक्रीला ठेवले, पण म्हणतात ना की जिथे पिकते तिथे विकत नाही, याप्रमाणेच त्यांच्या औषधाला सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र आपण बनवलेले हे औषध हे १०० टक्के गुणकारी असल्याने त्याचा संबधित व्यक्तींना लाभ मिळालाच पाहिजे यासाठी स्वत: सुरज याने आपल्या औषधाचे मार्केटिंग सुरु केले, जिल्ह्यातील सर्व आयुर्वेदिक औषधालयात जावुन त्याने हे औषध दिले मात्र तेथेही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, तरी ही खचुन न जादा या बहाद्दराने आपले काम सुरुच ठेवले, ज्यांना ज्यांना सुरुवातीला त्याने हे औषध दिले त्यांना फरक पडल्याने आपोआप त्यांच्या पावडरची सर्वत्र चर्चा सुरु झाली, आणी बघता बघता त्याची ही पावडर आता घरोघरी जावु लागली यासाठी त्याने आता होम फ्रॉम डिलीव्हरी व कँश ऑन डिलीव्हरी ( (COD ) हा पर्याय सुध्दा सुरु केल्याने त्याची ही पावडर आता गल्लीपासुन ते अगदी दिल्ली पर्यंत लोकं मागवु लागले आहेत. सुरज ने बनवलेले औषध हे निश्चीतच गुणकारी आहेच पण यासाठी त्याने केलेली चिकाटी व त्याची जिद्द ही खुप महत्वाची आहे. कोणताही व्यवसाय करायचा असल्यास संयम व जिद्द, आणी चिकाटी हे त्रिगुण प्रत्येक नव व्यावसायिकाच्या अंगी असणे हे फार महत्वाचे असल्याचे आज सुरज सांगत आहे. सुरजने हे १०० टक्के गुणकारी औषध निर्माण केल्याने आता सर्वत्र त्यांच्या विजय आयुर्वेदिक औषधालय या नावाची व दुकान ची चर्चा सुरु आहे. ०००

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

आरोग्य मित्राच्या संकल्पनेतुन साकारतंय खटाव तालुक्यात कँन्सर हॉस्पिटल

Next

म्हसवड पोलीस स्टेशन ला अधिकारी, मिळणार तर कधी ?

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme