Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
सामाजिक

संकल्प पुर्तीतुन नवसंजिवनी मिळेल – नगराध्यक्षा पुजा विरकर

By adminmandand
April 8, 2026 3 Min Read
0

म्हसवड दि.८ ( महेश कांबळे )
कँन्सरग्रस्त रुग्णांसाठी आरोग्य मित्र नितीन तिवाटणे यांनी केलेला संकल्प हा खरोखरच कौतुकास्पद असुन त्यांच्या संकल्पामुळे असंख्य रुग्णांना नवसंजिवनी मिळणार असल्याचे मत म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षा पुजा विरकर यांनी व्यक्त करीत तिवाटणे यांच्या संकल्पपुर्तीसाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन म्हसवडकरांना केले.
म्हसवड शहरात सर्वज्ञ सेवा संस्था व मुक्ता कँन्सर क्लिनिक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कँन्सर तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या, यावेळी डॉ. मुकुल घरोटे, डॉ. अभिजीत खाडे, डॉ. जयदेव काळेल, डॉ. जितेंद्र तिवाटणे, नगरसेवक युवराज सूर्यवंशी, नगरसेविका स्नेहल सूर्यवंशी, आरोग्य मित्र नितीन तिवाटणे आदी प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना नगराध्यक्षा विरकर म्हणाल्या की तिवाटणे यांनी म्हसवड शहरात अशा प्रकारच्या शिबाराचे आयोजन केले आहे ते कार्य प्रेरणादाई आहे, आजच्या धकाधकीच्या जिवनात माणसाला असंख्य आजार त्यांच्या न कळत त्यांना होत आहेत, त्याची योग्यवेळी तपासणी झाली तर त्या आजाराचे निदान होते, कोणत्याही आजाराचे निदान होणे हे सर्वात महत्वाचे आहे, आज काल अनेकांना कर्क रोग होत आहे, त्यावर वेळीच उपचार घेतल्यास तो पुर्णपणे बरा होतो त्यासाठी प्रत्येकाने न घाबरता स्वत:ची शारीरिक तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ. मुकुल घरोटे यांनी बोलताना सांगितले की कर्करोगाला कोणीही घाबरु नये, मात्र त्याकडे कोणी दुर्लक्ष ही करु नये, तो पुर्णपणे बरा होतो मात्र तो बळावला तर रुग्ण दगावु पण शकतो यासाठी प्रत्येकाने सकस आहार व नियमित व्यायाम करणे महत्वाचे आहे. मी आजवर हजारो रुग्ण पाहिले आहेत त्यांना आजाराचे निदान उशीरा झाले आहे, मात्र म्हसवड शहरात नितीन तिवाटणे यांनी स्वत: च्या आईचा या दुर्धर आजाराने बळी घेतल्याने यापुढे असा बळी कोणाचा जावु नये यासाठी सुरु केलेला लढा खरोखरच कौतुकास्पद आहे, त्यांनी अशा प्रकारच्या शिबीराचे आयोजन केल्याने अनेकांना येथे मोफत तपासणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तपासणी साठी येथे कोणतीही फी आकारली जाणार तर नाहीच या शिवाय प्रत्येकाचा तपासणी रिपोर्ट हा गोपनीय राहणार आहे.
तिवाटणे यांनी खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे सुरु केलेले कँन्सर हॉस्पिटल उभारणीचे काम हे खुपच महान काम आहे.त्याठिकाणी कँन्सरग्रस्त रुग्णांसाठी नवसंजिवनी दिली जाणार आहे, अद्यावत मशीन व तज्ञ डॉक्टरांची टिम तेथे तैनात केली जाणार आहे. याशिवाय गोशाळा उभारणीचे काम तेथे होणार आहे, तिवाटणे हे पेशाने इंजिनियर आहेत पण त्यांचा संकल्प हा अतिशय स्तुत्य आहे, कोणी डॉक्टरसुध्दा असा संकल्प करणार नाही तो त्यांनी केला आहे, त्यांच्या सारख्या व्यक्तीमुळेच आज कँन्सरग्रस्त रुग्णांना जगण्याची एक नवी उमेद मिळत आहे. त्यांनी हाती घेतलेले काम हे सर्वसामान्यांसाठी असल्याने सामान्य नागरिकांनीही पुढे येवुन त्यात आपले योगदान द्यावे, शेवटी लोकांचा सहभाग हा खुप महत्वाचा आहे, लोकवर्गणीतुन हे स्वप्न साकारलं जातयं यासाठी लोकांनीही पुढे यावे असे आवाहन शेवटी डॉ. घरोटे यांनी केले.
यावेळी इंजिनियर नितीन तिवाटणे म्हणाले की मी माझ्या आई ला या आजाराने तेव्हा तीला काय त्रास झाला हे अगदी जवळुन पाहिले आहे, त्यामुळे भविष्यात असा त्रास कोणालाही होवु नये यासाठी येथेच एक कँन्सर रुग्णालय उभारण्याचा संकल्प केला, त्यासाठी मी अनेक ठिकाणी जागा शोधली पण मला हवी तशी ती मिळाली नाही, जेव्हा माझे मित्र नितीन शेडे – पाटील यांना हे समजलं तेव्हा त्यांनी त्यांच्या स्वमालकीची एक एकर जागा यासाठी मोफत देवु केली, त्यामुळे खटाव तालुक्यातील सातेवाडी परिसरात हे रुग्णालय सुरु करण्याचा घाट घातला आहे, आता कामाला लवकरच सुरुवात होत असुन तेथील माळरानावर अशा रुग्णांना नवसंजिवनी देण्याचे मोठं काम होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली, यावेळी डॉ. विकास बाबर, डॉ. कुलकर्णी, डॉ. शहा, नितीन चिंचकर, डॉ.शितल तिवाटणे, सविता तिवाटणे, सचिन विरकर या सह बहुतांशी नागरिक उपस्थित होते. यावेळी १३० रुग्णांची आरोग्य तपासणी येथे करण्यात आली.०००

https://mandand.online/wp-content/uploads/2026/04/VID_20260407_115841855.mp4

Post Views: 2
Author

adminmandand

Follow Me
Other Articles
Previous

म्हसवड पोलीस स्टेशन ला अधिकारी, मिळणार तर कधी ?

Next

पिण्याच्या पाण्याचे पालिकेचे नियोजन तोकडे, प्रा. बाबर यांचे थेट जिल्हाधिकार्यांनाच साकडे

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme