Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
राजकारण

नगराध्यक्ष पदासाठी आता पाच महिला रिंगणात अर्ज माघारी नंतरच होणार चित्र स्पष्ट

By mandand76@gmail.com
November 18, 2025 2 Min Read
0

म्हसवड दि. १८ ( महेश कांबळे )
म्हसवड पालिका निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज पालिकेत दाखल केल्याने इच्छुकानी शंभरी पार केली होती, मात्र अर्ज छानणीत किती जणांचे अर्ज होणार यावर पुढील चित्र स्पष्ट होणार असुन थेट नगराध्यक्ष पदाच्या लढतीत आता पाच महिला निवडणुकीच्या रिंगणात राहिल्या आहेत, तर ४ महिलांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
म्हसवड पालिकेची पंचवार्षीक निवडणुक २ डिसेंबर रोजी संपन्न होत असुन या निवडणुकीची प्रक्रिया पालिका सभागृहात सध्या सुरु आहे, पालिका निवडणुकीसाठी १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती या दिवशीच अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हा आकडा शंभरी पार गेला, तर नगराध्यक्ष पदासाठी ही अनेक महिला इच्छुक असल्याने ही संख्या ही दोन आकड्यात गेली होती.
दरम्यान आज दि.१८ रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छानणी पालिका सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी मीना बाबर, व सह. निवडणुक अधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या समोर घेण्यात आली यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या ९ उमेदवारांच्या १२ अर्जाची छानणी करण्यात आली यामध्ये सुवर्णा सुनील पोरे, प्राजकता शुभम पोरे, जयमाला विशाल विरकर, कांता शंकर विरकर या भाजपच्या महिला उमेदवारांचे अर्ज पक्षाचे अधिकृत जोडपत्र नसल्याने ते अवैध ठरवण्यात आले. तर पुजा सचिन विरकर भाजप, भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, रुपाली वाल्मिक सरतापे बहुजन समाज पक्ष, तर गौरी विशाल माने व श्रीमती हिंदमालादेवी राजेमाने या दोन अपक्ष महिलांसह एकुण ५ महिलांचे अर्ज वैध ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज छानणीनंतर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख ही २१ नोव्हेंबर ही असुन या नंतरच नगराध्यक्ष पदाच्या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
पालिका सभागृहात उमेदवारांचे अर्ज छानणी ही अतिशय संथ गतीने परंतु काटेकोरपणे सुरु असल्याने एका प्रभागाची छानणी करण्यासाठी किमान १ तास लागत आहे यामुळे छानणी प्रक्रियेला विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.०००

गौरी विशाल माने ( अपक्ष )

 

 

 

    श्रीमती हिंदमालादेवी राजेमाने ( अपक्ष )
भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी )
रुपाली वाल्मिक सरतापे ( बहुजन समाज पक्ष )
पुजा सचिन विरकर ( भाजप )
Post Views: 2
Author

mandand76@gmail.com

Follow Me
Other Articles
Previous

पालिका निवडणुक अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांची झुंबड नगराध्यक्ष पदासाठी ९ महिला रिंगणात

Next

पालिका निवडणुक भयमुक्त व पारदर्शी व्हावी – अनिल देसाई

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme