म्हसवड दि. १८
म्हसवड पालिकेच्या होत असलेल्या निवडणुक प्रक्रियेमध्ये अधिकारीच वातावरण गंभीर करीत असुन लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सुरु असलेली ही निवडणुक प्रक्रिया पारदर्शी व्हावी, येथील सामान्य जनतेला लोकशाही ने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन निर्भयपणे आपला प्रतिनिधी निवडता यावा त्यांच्यावर कोणीही दहशत निर्माण करु नये यासाठी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे, येथील अधिकारी हे दुजापणा करीत असुन ते दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे उपाध्याय अनिल देसाई यांनी केला आहे.
म्हसवड पालिका निवडणुकीच्या निमीत्ताने दि.१७ रोजी पालिका सभागृहात तेजसिंह राजेमाने यांनी प्रशासनाच्या वागण्यावर हरकत घेत प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे त्या अनुशंघाने देसाई यांनी म्हसवड येथे येत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की येथील पालिका सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी यांनी वेळेनंतर बंद केलेला मुख्य दरवाजा पुन्हा उघडुन काही जणांना निवडणुक कार्यालयात प्रवेश दिला आहे याचे सिसिटीव्ही फुटेजची आम्ही मागणी केली आहे, तर या अधिकार्यांवर दबाव टाकण्यासाठी येथील मंत्र्याचा एक शासकीय हस्तक हा दिवसभर या ठिकाणी बसुन होता, वास्तविक त्याची येथे वा या परिसरात कोठेच नेमणुक नाही याची आम्ही माहिती घेतली आहे, केवळ प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी ती व्यक्ती याठिकाणी उपस्थित असल्याने आम्ही त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वास्तविक हा सरकारी बाबु याठिकाणी नियुक्ति नसताना काय करीत होता असा प्रश्न यावेळी देसाई यांनी उपस्थित करीत सरकारी कर्मचारी असलेल्या गुलाब उगलमोगले यांच्या बडतर्फीची मागणी करीत प्रशासनाने एकतर्फी कामकाज न करता आपल्या कामात समानता व पारदर्शी पणा आणुन पालिकेची ही निवडणुक भय मुक्त व दहशतमुक्त करावी यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी केली आहे. असेही देसाई यांनी शेवटी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, युवा नेते तेजसिंह राजेमाने, प्रा. विश्वंबर बाबर, माऊली कोळेकर, बाळु डोंगरे, दादासाहेब दडस, बबन विरकर आदी उपस्थित होते.
दरम्यान देसाई यांनी केलेल्या या आरोपानंतर पत्रकारांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण राजेमाने यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली असुन त्यांनी मागणी केल्याप्रमाणे सिसिटीव्ही फुटेज तपासणार आहे, तर निवडणुक प्रक्रियेतील नियु्क व्यक्तींशिवाय इतर कोणत्याही सरकारी कर्मचार्याला येथे प्रवेश देवु नये अशा स्पष्ट सुचना आपण निवडणुक निर्णय अधिकारी यांना दिल्या असल्याचे सांगितले, तर फुटेज तपासल्यावर संबधित कर्मचार्यावर कारवाई करण्याचे संकेत ही यावेळी श्री. मोहिते यांनी दिले.
