


म्हसवड दि.२१
म्हसवड पालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या दोन अपक्ष महिलांसह सदस्य पदाच्या १५ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने म्हसवड पालिका निवडणुक ही आता दुरंगी होण्यावर शिक्का मोर्तब झाले आहे, तर २१ जागेसाठी आता ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले असुन नगराध्यक्ष पदासाठी भाजप, राष्ट्रवादी व बसपा अशी लढत होणार आहे, याबरोबरच काही प्रभागात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
म्हसवड पालिकेच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या थेट नगराध्यक्षपदासाठी १२ तर २० नगरसेवक पदांसाठी तब्बल १२३ अर्जाची छाननी करण्यात आली होती.
दि.२१ हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवस असल्याने या दिवशी कोण, कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन नगराध्यक्ष पदाच्या व पंधरा नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असुन अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ गौरी विशाल माने व हिंदमालादेवी राजेमाने यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता पालिकेची लढत हि बहुतांशी प्रभागात दुरंगी च होणार आहे.
तर नगरसेवक पदाचे प्रभाग क्र १ मधुन तेजस्वी संजय सोनवणे, सोमनाथ अजिनाथ कवी प्रभाग क्र २ मधुन आनंदा महादेव मासाळ, सोनम अविनाश मासाळ, किर्ती आनंदा मासाळ प्रभाग क्र ३ मधुन रघुनाथ श्रीपती लोखंडे, विक्रम विलास लोखंडे, सुनिता जालिंदर माने प्रभाग क्र ४ मधुन काझी हमराज निसार अहमद, प्रभाग क्र ५ मधुन मोनिका महेश लिंगे, प्रभाग क्र ७ मधुन प्रतिक्षा सोमनाथ कवी प्रभाग क्र ८ मधुन प्रतिक्षा स्वप्नील माने, धनाजी रामचंद्र माने, सत्यवान विठ्ठल शेंबडे, प्रभाग क्र १० मधुन विरकर बापूराव आनंदा, या पंधरा उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यामुळे आता दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे.
दरम्यान अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये जिल्हा बँकेचे संचालक युवा नेते शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष पदासह अन्य प्रभागातुन ८ उमेदवारांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते, एक अर्ज भाजपच्या नावाने तर एक अपक्ष असे उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या उमेदवारांना भाजपचे जोडपत्र मिळेल असे बोलले जात होते, मात्र त्यांच्या कोणत्याच उमेदवाराला भाजपचे जोडपत्र न मिळाल्याने त्यांच्या सर्वच उमेदवारांचे भाजपचे अर्ज बाद झाले, मात्र त्यांच्या सर्व उमेदवारांनी अपक्षही अर्ज दाखल केले होते ते सर्व अर्ज छानणीत वैध ठरल्याने पालिका निवडणुक ही तिरंगी होईल असे राजकिय वर्तुळातुन बोलले जात होते, मात्र अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेखर गोरे यांच्या सर्वच उमेदवारांनी निवडणुकीतुन माघार घेतल्याने राजकिय वर्तुळातुन पुन्हा उलट – सुलट चर्चा सुरु आहे. तर शेखर गोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातुन माघार घेतल्याने आता भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा सरळ सामना होणार आहे. तर भाजप विरोधी सर्व विरोधी गट अशी ही लढाई होत असली तरी काही प्रभागात ही लढाई तिरंगी होणार आहे.
म्हसवड पालिका निवडणुकीसाठी
दि.१८ रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची छानणी पालिका सभागृहात निवडणुक निर्णय अधिकारी मीना बाबर, व सह. निवडणुक अधिकारी डॉ. सचिन माने यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या समोर घेण्यात आली यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या ९ उमेदवारांच्या १२ अर्जाची छानणी करण्यात आली होती त्यामध्ये ७ अर्ज बाद झाले होते तर पाच अर्ज वैध झाले होते या पाच उमेदवारी अर्जापैकी आज दोन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले तर पंधरा नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे पालिकेची लढत हि आता दुरंगी होणार आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी भाजप, राष्ट्रवादी व बसपा असा तिरंगी सामना होत असुन यामध्ये भाजपकडुन पुजा सचिन विरकर, राष्ट्रवादीकडुन भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने, तर बसपा कडुन रुपाली वाल्मिक सरतापे या तिन महिलांमध्ये टक्कर होणार आहे.
